दुय्यम निबंधक कार्यालयात लाचलुचपत विभागाचा छापा;लाच घेताना दोघे रंगेहाथ अटक


नाशिक :- नांदगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खताच्या दस्तांची प्रमाणित नक्कल काढून देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोघांना रंगेहाथ पकडले आहे. यामध्ये एका आयटी असिस्टंट (डाटा एंट्री ऑपरेटर) आणि एका खाजगी इसमाचा समावेश आहे या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
यांच्यावर झाली कारवाई - धारासिंग बाबुलाल राठोड,(वय ५३) आयटी असिस्टंट (डाटा एंट्री ऑपरेटर),दुय्यम निबंधक कार्यालय,नांदगाव सागर राजेंद्र बोरसे,(वय ३३) - खाजगी इसम
नेमकी घटना काय?
तक्रारदार यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीची त्यांच्या चुलत आजोबांनी परस्पर विक्री केली होती या प्रकरणाच्या कायदेशीर लढाईसाठी तक्रारदारांना जुन्या खरेदी खताच्या दस्तांची प्रमाणित नक्कल हवी होती त्यासाठी त्यांनी १८ मार्च २०२६ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, नांदगाव येथे अर्ज केला होता.
सदर कागदपत्रे काढून देण्यासाठी ३२० रुपये सरकारी फीचे ऑनलाइन चलन भरायला लावले गेले त्यानंतर आरोपींनी तक्रारदाराकडे सुरुवातीला १,२०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १,००० रुपये देण्याचे ठरले 
एसीबीने रचला सापळा
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर,यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने १२ जून २०२६ रोजी नांदगाव दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा रचला तक्रारदाराकडून १,००० रुपयांची लाच स्वीकारताना दोन्ही आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली.सध्या नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाई करणारे पथक:
ही कारवाई लाप्रवि नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,आणि सुनील दोरगे, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सापळा पथकात पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर,पोलीस अंमलदार दिनेश खैरनार,अविनाश पवार,आणि चालक शेख यांचा समावेश होता.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी करत आहेत 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या