सौर ऊर्जा प्रकल्पातून ६० हजारांची केबल चोरीस; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक देवळा :- देवळा तालुक्यातील वखारी (भिलवाड) शिवारातील 'पुरुषोत्तम कुसुम सौर ऊर्जा प्रकल्प' येथे अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला असून,प्रकल्पातील ६० हजार रुपये किमतीची डीसी केबल चोरून नेली आहे.याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,भूषण पोपट भदाणे (वय २७, रा.भावडे, ता. देवळा) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.भूषण हे या सौर ऊर्जा प्रकल्पात साईट इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. १४ जूनच्या रात्री ८ वाजेपासून ते १५ जूनच्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली.
चोरट्यांनी प्रकल्पातील ५ स्ट्रिंग मॉनिटरिंग बॉक्सला (SMB) जोडलेली, अंदाजे ८००० मीटर लांबीची काळ्या-लाल रंगाची डीसी केबल चोरून नेली. या चोरीला गेलेल्या मालाची एकूण किंमत ६० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर देवळा पोलिसांनी भा.न्या. सं. कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात आरोपींताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण,करत आहेत.या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून,चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या