नाशिक :- सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर तसेच शहराच्या सर्वांगीण पायाभूत विकासासाठी नाशिक महानगरपालिकेकडून विविध महत्त्वाच्या रस्त्यांचे मेकओव्हर करण्यात येत आहे. त्याअंतर्गत अशोक स्तंभ ते जेहान सर्कल तसेच जेहान सर्कल ते गंगापूर गाव महानगरपालिका हद्दीपर्यंतच्या गंगापूर रोडच्या विकासकामांना वेग आला आहे.
नाशिक पश्चिम विभागातील हा मार्ग शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक मानला जातो. सुमारे ३.१९० किलोमीटर लांबीच्या डांबरी रस्त्याच्या विकासासोबत विविध भूमिगत सुविधा आणि नागरी पायाभूत सुविधांची कामेही मोठ्या प्रमाणावर पूर्ण करण्यात आली आहेत.
या मार्गावर अमृत योजनेअंतर्गत सांडपाणी वाहिनीची १,६७८ मीटर लांबीची कामे १०० टक्के पूर्ण झाली आहेत. तसेच अमृत डीपीआर-२ अंतर्गत २८० मीटर सांडपाणी वाहिनीचे कामही पूर्ण झाले आहे.महानगरपालिका बाँड प्रकल्पांतर्गत प्रस्तावित एमएनजीएल गॅस पाइपलाइनचे १,३२० मीटर काम पूर्ण झाले असून, महानगरपालिकेच्या ऑप्टिकल फायबर केबल (OFC) आणि विद्यमान विद्युत पायाभूत सुविधांचे ३,०४३ मीटरपर्यंतचे कामही पूर्ण करण्यात आले आहे.दरम्यान, ३,५७२ मीटर लांबीच्या पावसाळी पाणी निचरा वाहिनीचे (Storm Water Drain) काम सध्या प्रगतीपथावर असून,ते पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे.
युटिलिटी सुविधा
लांबी (मीटर)
प्रगती
अमृत योजनेअंतर्गत सांडपाणी वाहिनी
१,६७८
१०० टक्के पूर्ण
अमृत डीपीआर-२ सांडपाणी वाहिनी
२८०
१०० टक्के पूर्ण
महानगरपालिका बाँड अंतर्गत एमएनजीएल गॅस पाइपलाइन
१,३२०
१०० टक्के पूर्ण
ऑप्टिकल फायबर केबल (OFC) व विद्यमान विद्युत पायाभूत सुविधा
३,०४३
१०० टक्के पूर्ण
पावसाळी पाणी निचरा वाहिनी (स्टॉर्म वॉटर ड्रेन)
३,५७२
काम प्रगतीपथावर
रस्त्याचे व पूरक सुविधांचे काम पूर्ण झाल्यानंतर गंगापूर रोडवरील वाहतूक अधिक सुरळीत, सुरक्षित आणि गतिमान होणार असून नागरिकांना आधुनिक नागरी सुविधांचा लाभ मिळणार आहे.
- मनीषा खत्री, आयुक्त, महानगरपालिका,नाशिक
0 टिप्पण्या