नाशिक :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दिनांक १ जुलै ते ३ जुलै २०२६ या कालावधीत पंचवटी,नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम,नाशिक रोड,नवीन नाशिक,सातपूर या भागातील प्रभाग क्रमांक ५,८,१२,१४,१८ आणि २५ मध्ये मान्सून टास्क फोर्सचे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.या अभियानाअंतर्गत पावसामुळे निर्माण होणाऱ्या नागरी समस्यांचे तातडीने निराकरण नाशिक महानगरपालिकेने यंदा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या थेट समन्वयातून विशेष “मॉन्सून टास्क फोर्स”कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सून टास्क फोर्सच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील यशस्वी कामांना पुढे नेत शहरातील विविध भागांमध्ये अधिक गतिमान पद्धतीने उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.अभियानादरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा,पावसाळी गटारांची स्वच्छता,रस्त्यांवरील खड्डे,कचरा निर्मूलन,पाणीगळती, अतिक्रमण तसेच इतर नागरी समस्यांवर विशेष भर देण्यात येणार आहे.प्रत्येक प्रभागासाठी मुख्य संपर्कप्रमुख नियुक्त करण्यात आले असून,नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात,असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.‘मान्सून टास्क फोर्सच्या पहिल्या टप्प्यात हाती घेतलेल्या कामांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात विविध विभागांच्या समन्वयातून अधिक व्यापक स्वरूपात उपाययोजना राबवून नागरिकांना सुरक्षित,स्वच्छ आणि सुकर सुविधा उपलब्ध करून देण्याची मोहीम अधिक गतिमान करण्यात आली आहे.असे
आयुक्त मनीषा खत्री महापालिका, नाशिक यांनी सांगितले.
१ जुलै ते ३ जुलै २०२६ दरम्यान राबविण्यात येणारे विशेष अभियान
विभाग (Division)
प्रभाग क्रमांक
पंचवटी
प्रभाग क्र. ५
नाशिक पूर्व
प्रभाग क्र. १४
नाशिक पश्चिम
प्रभाग क्र. १२
नाशिक रोड
प्रभाग क्र. १८
नवीन नाशिक
प्रभाग क्र. २५
सातपूर
प्रभाग क्र. ९
या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेले विभागीय समन्वयक अधिकारी पुढीलप्रमाणे :
विभाग
नोडल अधिकारी
संपर्क क्रमांक
पंचवटी विभाग
राहुल जाधव
८०१०४६२८१६
नाशिक पूर्व
हेमंत झुटे
९६८९७५८५९५
नाशिक पश्चिम
चंदन घुगे
८८८८३२४८४९
नाशिक रोड
प्रज्ञा त्रिभुवन
९६०७१३०११०
नवीन नाशिक
नानासाहेब साळवे
९९२२४११८४७
सातपूर
सुनील राजभोज
७७९८६४४४११ / ८९९९६१४०७३
महापालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या परिसरातील पावसाळ्याशी संबंधित कोणतीही समस्या संबंधित नगरसेवकांकडे कळवावी.स्थानिक प्रतिनिधींच्या माध्यमातून या समस्या थेट विशेष पथकांपर्यंत पोहोचतील आणि त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल.
0 टिप्पण्या