देशदूत सर्कल परिसरात सुरू असलेल्या चेंबरच्या कामासंदर्भात मक्तेदारास पन्नास हजार दंड

कुंभमेळा विकासकामांबाबत महापालिकेचे स्पष्टीकरण  मक्तेदारास पुन्हा नव्याने गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश

नाशिक :- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध पायाभूत सुविधा विकासकामे सुरू असून,देशदूत सर्कल परिसरात सुरू असलेल्या चेंबरच्या कामासंदर्भात काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत मक्तेदाराकडून स्पष्टिकरण मागितले असता,कॅांक्रीटच्या कामासाठी क्युरींगला वेळ द्यावा लागतो म्हणून ते काम आधी करण्यात येत होते. तथापी याप्रक्रियेदरम्यान ताजे काँक्रीट शेजारील चेंबरमध्ये जाऊ नये यासाठी त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात वीटा ठेवण्यात आल्या होत्या,काँक्रीट स्थिर झाल्यानंतर हे तात्पुरते बांधकाम काढून त्या ठिकाणी नवीन चेंबर बांधण्यात येणार आहे,असे मक्तेदाराने स्पष्टिकरण दिले होते. 
सदर स्पष्टीकरण संबंधाने डिपीआर कन्सल्टंट,पी एम सी,यांना पाहाणी करण्यास सांगितले त्यानुसार अशा साईटवर तात्काळ नियोजन म्हणून लाकडी फळ्या,स्टीलच्या प्लेट अथवा अशा स्वरूपाचे तात्पुरते उपाय करण्यात येतात.त्यामुळे प्रसिद्ध झालेला व्हिडिओमध्ये पुर्णपणे सत्यता नाही.तथापी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) यांनी सदरचे तात्पुरते काम तातडीने तोडून टाकावे व पुन्हा नव्याने गुणवत्तापूर्ण बांधकाम करावे अशा सूचना मक्तेदारास दिल्या होत्या.मात्र विहित मुदतीत मक्तेदाराने सदरचे तात्पुरते बांधकाम काढून टाकून नव्याने काम केले नाही त्यामुळे संबंधित मक्तेदाराविरुद्ध करारातील अटींनुसार रु. 50,000/- (पन्नास हजार) दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी मक्तेदारास सक्त निर्देश देण्यात आले आहेत.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेली सर्व विकासकामे निर्धारित दर्जा,सुरक्षितता व तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन करूनच पूर्ण करण्यात यावीत यासाठी महानगरपालिकेमार्फत सातत्याने देखरेख ठेवण्यात येत असून, कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा अनधिकृत कामकाज आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या