नाशिक - ग्रामदैवत बिरोबा देवाचा चोरीला गेलेला चांदीचा मुखवटा हस्तगत एक अटकेत


सिन्नर :- दोडी बुद्रुक येथील 'बिरोबा देवाचा' चांदीचा मुखवटा चोरी करणारा चोरट्याला अटक; ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त

नाशिक :-सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील ग्रामदैवत बिरोबा देवाचा चोरीला गेलेला चांदीचा मुखवटा शोधण्यात वावी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपीताला अटक केली असून,त्याच्याकडून ४५,००0 रुपये किमतीचा ९३८ ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा जप्त केला आहे.घराचा दरवाजा उघडा पाहून केली होती चोरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जून २०२६ रोजी फिर्यादी महेंद्र जगन्नाथ शिंदे (रा.दोडी बु.ता. सिन्नर) यांनी वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.त्यांची आजी भामाबाई काशिनाथ शिंदे, यांच्या राहत्या घराचा दरवाजा उघडा असताना,अज्ञात चोराने घरात घुसून देवाचा चांदीचा मुखवटा चोरून नेला होता. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २३७/२०२६ नुसार 'भारतीय न्याय संहिता' (BNS) कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी गजाआड
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वावी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे,यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ तपासाचे आदेश दिले.तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत इसम कार्तिक भिमा शिंदे (रा. दोडी, ता. सिन्नर) याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. २१ जून २०२६ रोजी त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली.न्यायालयाने आरोपीला २३ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शेताच्या बांधावरून मुखवटा जप्त
कोठडी दरम्यान पोलिसांनी आरोपीताला विश्वासात घेऊन चौकशी केली असता,त्याने चोरीचा मुखवटा उगलेवाडी (दोडी शिवार) येथील एका शेताच्या बांधावर, दगडांच्या कपारीत लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपीताने काढून दिलेला ९३८ ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा जप्त केला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गोरे,करत आहेत.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी,अपर पोलीस अधीक्षक विमला एम. आणि निफाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी के. के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.पथकात गणेश शिंदे, (सहायक पोलीस निरीक्षक)पोहवा/ शिंदे,पोहवा/ निरगुडे,पोना/ गोरे (तपास अधिकारी),पोशि/गणेश पवार,पोशि/सागर सारंगधर,पोशि/किरण पवार,पोशि/रोशन गायकवाड,पोहवा/गिलबिले (तांत्रिक विभाग) पोना/बहिरम आदींचा समावेश होता.वावी पोलिसांच्या या तत्पर कामगिरीमुळे दोडी बुद्रुक परिसरातील नागरिकांनी आणि भाविकांनी पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या