ओझर येथील स्वामी समर्थ केंद्रातील दानपेटी चोरणारे गजाआड; नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
(ओझर प्रतिनिधी)
ओझर (नाशिक):- ओझर शहरातील बाजारपेठ भागात असलेल्या स्वामी समर्थ केंद्रातून दानपेटी चोरणाऱ्या टोळीचा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांतच पर्दाफाश केला आहे.याप्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला (विधीसंघर्षीत बालक) पोलिसांना ताब्यात घेतले असून,त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.अंदाजे १५ हजारांची झाली होती चोरी मिळालेल्या माहितीनुसार, २९ मे २०२६ रोजी ओझर येथील स्वामी समर्थ केंद्रातून अज्ञात चोरांनी चौकोनी आकाराची लोखंडी दानपेटी चोरून नेली होती. या दानपेटीत अंदाजे १५,००० रुपयांची रोकड होती.याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ११३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे अटक
या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला.पोलीस पथकाने मंदिर परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर उपलब्ध तांत्रिक पुराव्यांची सखोल पडताळणी केली.यादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीताचे नाव ओंकार देविदास जाधव (वय २० वर्ष)राहणार: दत्तनगर, शेलारमळा, ओझर, तालुका निफाड.
चोरीच्या पैशातून खरेदी केले नवीन कपडे आणि बूट!पोलिसांनी संशयित आरोपीत ओंकार जाधव, याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता,त्याने आपल्या एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीताच्या ताब्यातून चोरीला गेलेली लोखंडी दानपेटी आणि १,०४० रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. उर्वरित चोरीच्या पैशांमधून आरोपीने स्वतःसाठी नवीन कपडे आणि बूट (शुज) खरेदी केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.आरोपीताला पुढील तपासकामासाठी ओझर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.ही यशस्वी कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून,ओझर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
0 टिप्पण्या