नाशिक :- जागतिक आपत्कालीन वैद्यक दिन (World Emergency Medicine Day) निमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथे आपत्कालीन वैद्यक विभाग (Emergency Medicine Department) आणि या विभागामध्ये कार्यरत डॉक्टर,नर्सिंग कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ तसेच ॲम्ब्युलन्स टीम यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. रुग्णांच्या आयुष्यातील सर्वात गंभीर आणि निर्णायक क्षणी तत्परतेने सेवा देणाऱ्या या आरोग्यसेवकांप्रती यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचा आपत्कालीन वैद्यक विभाग २४x७ कार्यरत असून तो प्रशिक्षित Emergency Physicians आणि Intensivists यांच्या नेतृत्वाखाली चालवला जातो. अपघात,हृदयविकाराचा झटका, मेंदूविकार (स्ट्रोक),गंभीर संसर्ग, श्वसनविकार,विषबाधा तसेच इतर जीवघेण्या वैद्यकीय परिस्थितींमध्ये येथे तातडीने आणि प्रभावी उपचार उपलब्ध करून दिले जातात. अत्याधुनिक ट्रॉमा केअर सुविधा, सुसज्ज ॲम्ब्युलन्स सेवा,आधुनिक ICU, CT Scan तसेच विविध सुपरस्पेशालिटी विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वयामुळे अनेक गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळून नवजीवन मिळाले आहे.
यावेळी बोलताना डॉ.अखिलेश सोमानी,प्रमुख - आपत्कालीन वैद्यक विभाग (HOD, Emergency Medicine) म्हणाले,"आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. अपघात, हृदयविकाराचा झटका,स्ट्रोक किंवा इतर कोणतीही गंभीर अवस्था असो, योग्य वेळी उपचार मिळाल्यास अनेक रुग्णांचे प्राण वाचवता येतात. विशेषतः अपघातानंतरचा किंवा गंभीर वैद्यकीय परिस्थितीनंतरचा पहिला एक तास म्हणजेच‘Golden Hour’अत्यंत महत्त्वाचा असतो.या कालावधीत योग्य उपचार मिळाल्यास मृत्यू आणि कायमस्वरूपी अपंगत्वाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. Emergency Medicine ही केवळ एक वैद्यकीय शाखा नसून रुग्णाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी दिला जाणारा आधार आहे."ते पुढे म्हणाले,"अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आपत्कालीन विभाग, प्रशिक्षित डॉक्टर, नर्सिंग टीम, ॲम्ब्युलन्स सेवा आणि विविध सुपरस्पेशालिटी तज्ज्ञ एकाच छताखाली उपलब्ध आहेत.त्यामुळे गंभीर रुग्णांवर तातडीने आणि प्रभावी उपचार करणे शक्य होते. आमची टीम २४ तास,वर्षातील ३६५ दिवस रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज असते."
यानंतर डॉ.भाविक शाह,प्रमुख – क्रिटिकल केअर विभाग (HOD, Critical Care),क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट व इंटेन्सिव्हिस्ट यांनी सांगितले."गंभीर रुग्णांच्या उपचारांमध्ये आपत्कालीन वैद्यक विभाग आणि क्रिटिकल केअर विभाग यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. अनेक वेळा रुग्णांची प्रकृती काही मिनिटांत गंभीर होऊ शकते.अशा परिस्थितीत त्वरित निदान,उपचार आणि आवश्यकतेनुसार ICU मध्ये दाखल करणे हे जीव वाचवण्यासाठी निर्णायक ठरते. अत्याधुनिक क्रिटिकल केअर सुविधा,व्हेंटिलेटर सपोर्ट,सतत मॉनिटरिंग आणि अनुभवी इंटेन्सिव्हिस्ट टीमच्या सहाय्याने आम्ही गंभीर रुग्णांना सर्वोत्तम उपचार देण्याचा प्रयत्न करतो. ‘Golden Hour’मध्ये मिळालेले योग्य उपचार रुग्णाच्या पुनर्प्राप्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात."अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी,यांनी सांगितले,"आपत्कालीन वैद्यक विभाग हा कोणत्याही रुग्णालयाचा कणा असतो.डॉ.अखिलेश सोमानी,डॉ. भाविक शाह आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अनेक गंभीर रुग्णांना वेळेत उपचार देऊन जीवदान दिले आहे. अत्याधुनिक सुविधा,अनुभवी तज्ज्ञ आणि २४x७ उपलब्ध सेवा यामुळे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल रुग्णांना जलद, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण उपचार देण्यासाठी कटिबद्ध आहे."जागतिक आपत्कालीन वैद्यक दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलकडून नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला असून,आपत्कालीन वैद्यक तज्ज्ञांकडून २४x७ मोफत सल्ला (Free Consultation by Emergency Physician) उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोणतीही आपत्कालीन आरोग्य समस्या उद्भवल्यास उपचारांमध्ये विलंब न करता तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.“Every Second Counts”हा संदेश देत अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने आपत्कालीन सेवेमध्ये कार्यरत सर्व डॉक्टर,नर्सेस,पॅरामेडिक्स,ॲम्ब्युन्स कर्मचारी आणि आरोग्यसेवकांना मानवंदना अर्पण केली.
0 टिप्पण्या