मालेगाव :- शहरात घातक अग्निशस्त्रे बाळगणारे आणखी दोन सराईत गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई- ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०३ जिवंत काडतुसे हस्तगत नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण डि एस स्वामी यांचे आदेशान्वये कारवाई करण्यात येत आहे.
त्यानुसार दि. २३/०५/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मालेगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत काही संशयीत इसम अवैधरीत्या घातक अग्निशस्त्रे बाळगून काहीतरी गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत असल्याची बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे स्थागुशाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मालेगाव शहर पो.स्टे. हद्दीतील मास्टर मॉर्डन टेलर दुकानाचे बाजूस,विजयनगर परिसरातून दोन संशयीतांना ताब्यात घेतले.
१) साजिद युनूस खाटीक,वय ३४, रा. सर्वे नं. ५५, विजयनगर, मालेगाव,जि.नाशिक
२) अकील अहमद तुफैल अहमद, वय ३८, रा. गट नं. २७५, द्याने रमजानपुरा,मालेगाव,जि.नाशिक
ताब्यात घेतलेले वरील दोन संशयीतांची अंगझडती घेतली असता,त्यांचे कब्जात ०१ देशी बनावटीचे पिस्टल व ०३ जिवंत काडतुसे मिळून आले.सदर इसम हे शस्त्र बाळगण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसतांना घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगतांना मिळून आले असून त्याबाबत त्यांना विचारपूस केली असता,सदर देशी बनावटीचे पिस्टल हे त्याचा साथीदार मालेगाव शहरातील सराईत गुन्हेगार ३) इम्रान बिल्डर, रा.शाबान नगर,मालेगाव (फरार) यांचेकडून आणले असल्याचे सांगितले आहे. यातील आरोपी हे विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगतांना मिळून आले असून त्यांचेविरुद्ध मालेगाव शहर पोलीस ठाणेस गुरनं १५४/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मागील चार दिवसांमध्ये आयशनगर व मालेगाव शहर पो.स्टे.हद्दीत सराईत गुन्हेगारांवर कारवाई करून, एकूण ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०५ जिवंत काडतुसे हस्तगत करून कारवाई केलेली आहे. सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी वरीलप्रमाणे कारवाई सुरू राहणार आहे.नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने वरील प्रमाणे घातक अग्निशस्त्रे बाळगणारे सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली आहे.
0 टिप्पण्या