Kalavan - आदीवासी तालुक्यातील 15 आश्रमशाळेत जनभागीदारी कार्यक्रम

नाशिक :-  प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (PM-JANMAN) आणि धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत जिल्ह्यात जनभागीदारी अभियानास प्रारंभ झाला असून,या अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या लाभार्थी संतृप्ती शिबिरांचा अनुसूचित जमातीतील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण,डॉ.कश्मिरा संखे यांनी केले आहे.या अभियानांतर्गत 22 मे रोजी शासकीय /अनुदानित आश्रमशाळा मानूर,तताणी,भिलवाड,वाघंबा ता.सटाणा,नरूळ,खिराड, बापखेडा, मोहनदरी सुळे ता.कळवण,सराड,भोरमाळ, बुबळी,खुंटविहिर,माणी ता.सुरगाणा तसेच गरबड जि. नाशिक एकूण 15 आश्रमशाळेत जनभागिदारी अभियानाचा कार्यक्रम घेण्यात आला. शिबिरासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी,वरीष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक,आदिवासी विकास निरीक्षक,शिक्षण विस्तार अधिकारी,वरीष्ठ लिपिक,सांख्यिकी सहाय्यक व कनिष्ठ लिपिक तसेच गावातील सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी, महिला बाल विकास प्रकल्प, तालुका आरोग्य अधिकारी,महिला बचत गट,तसेच परिसरातील आदिवासी नागरिकांना आदिवासी विकास,आरोग्य विभाग,सकस पोषण आहारासंबंधी तसेच आदिवासी स्वयंसेवी महिला गट उपस्थित होते.आरोग्य विभागामार्फत रक्तदान शिबिर, तसेच उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी आयोजित जनसुनवाई मध्ये नागरिकांच्या अडचणी समजून मार्गदर्शन केले.दुर्गम भागातील नागरिकांना एकाच छताखाली सर्व शासकिय योजनांच्या सेवा मिळाव्यात यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये भिल्ल,कोकणा,वारली,महादेव कोळी इत्यादी समाजातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.कळवण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींतध्ये या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी शिबिरात सहभाग नोंदवून लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ.संखे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या