chandvad - चांदवड पोलिसांची थरारक कारवाई! जीवाची परवा न करता तस्करांच्या तावडीतून गोवंशाची सुटका; लाखांचा मुद्देमाल जप्त!


चांदवडमध्ये गोवंशाची तस्करी करणारी कार पकडली;पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

(चांदवड प्रतिनिधी)
कत्तलीसाठी गोवंश वाहून नेणारी कार पकडली; पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न, चांदवडमधील धक्कादायक घटना
चांदवड:
कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत क्रूरपणे कारमध्ये डांबून वाहून नेला जाणारा गोवंश चांदवड पोलिसांनी पकडला आहे. ही कारवाई करत असताना आरोपींनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा थरारक प्रयत्न केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अशी आहे घटना

मुंबई-आग्रा हायवे रोडवर रेणुका माता मंदिर चौफुली ते चांदवड चौफुली दरम्यान ही घटना घडली. एका पांढऱ्या रंगाच्या शेवरलेट कॅप्टिवा कारमधून (क्र. MH 09 BF 8080) गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलीस कर्मचारी शासकीय वाहनासह गणवेशात तैनात होते.
पहाटे साडेसहाच्या सुमारास संशयित कार येताना दिसली. पोलिसांनी हात दाखवून,हेडलाईट कमी-जास्त करून आणि सायरन वाजवून कार थांबवण्याचा इशारा केला.मात्र,समोर पोलीस असल्याचे पाहूनही आरोपींनी कार थांबवली नाही.

पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न

आरोपींनी आपसात संगनमत करून पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कार चुकीच्या बाजूने (राँग साईड) आणली. त्यांनी कारचा वेग वाढवून पोलिसांच्या शासकीय वाहनाला (क्र. MH 15 HH 0446) समोरून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत पोलीस कर्मचारी आणि साक्षीदार जखमी झाले असून शासकीय वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

चार गोवंश जप्त

पोलिसांनी कारची तपासणी केली असता,त्यात अत्यंत छोट्या जागेत ४ गोवंश (नर जातीचे गोऱ्हे) क्रूरपणे बांधून ठेवलेले आढळले. त्यांची किंमत सुमारे १७,००० रुपये आहे.पोलिसांनी गोवंशासह गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.

आरोपीतांची नावे

१) अबु सुफियान अब्दुल करीम अन्सारी (वय ३२, चालक, रा. रमजानपुरा, मालेगाव)
२) मोहम्मद इरफान मोहम्मद अल्ताफ अन्सारी (वय २०, रा. इस्लामाबाद, मालेगाव)

विविध कलमांखाली गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गोविंद अंबादास राऊत यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील विविध कलमांसह, प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मोटार वाहन कायद्यानुसार चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल बी.मोरे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या