निफाड :- येथील शिवडी परिसरात असलेल्या एका बंद दुकानाचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला.दुकानातून सुमारे ११ हजार १०० रुपयांचा किराणा माल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी निफाड पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.फिर्यादी सागर मनोहर किरकाडे (वय ३० वर्ष, रा. शिवडी, निफाड) यांचे शिवडी येथे 'माऊली प्रसाद जनरल स्टोअर्स' नावाचे किराणा दुकान आहे दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळी ८:३० ते १०:०० वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद दुकानाचा मुख्य दरवाजा उचकटून आत प्रवेश केला दुकानातील विविध कंपन्यांचे बिस्किट्स, चॉकलेट्स, कुरकुरे आणि नारळ असा एकूण ११ हजार १०० रुपये किमतीचा माल चोरून नेला
चोरीला गेलेला माल:
नारळ: १०० नग (किंमत ₹२,०००)
कुरकुरे: २ बॉक्स (किंमत ₹४,०००)
पारले बिस्कीट: ४ बॉक्स (किंमत ₹३,०००)
सोनपापडी व चॉकलेट: एकूण ८ बरण्या (किंमत ₹१,७००)
इतर माल: ४ डझन (किंमत ₹४००)
पोलिसांची तात्काळ कारवाई, दोघे गजाआड या घटनेनंतर सागर किरकाडे यांनी निफाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी बी.एन.एस. कलम ३३१(४), ३०५ अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल केला पोलीस निरीक्षक गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
अटक केलेल्या आरोपींची नावे:
१. सुनील दत्तू घुळे (वय २४ वर्षे, रा. बेघर वस्ती, सारोळे खुर्द, ता. निफाड)
२. मंगेश रमेश नायात्रे (वय २२ वर्षे, रा. निफाड)
दोन्ही आरोपींना २५ मे २०२६ रोजी रात्री ११:०१ वाजता पोलिसांनी अधिकृतपणे अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक (मपोना/२७१५) गायकवाड करत आहेत.
0 टिप्पण्या