चांदवडमध्ये घराच्या आडोशाला विक्रीसाठी असलेला गुटख्याचा साठा जप्त; एकाला अटक


(चांदवड प्रतिनिधी)
चांदवड :- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका इसमावर चांदवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत पोलिसांनी हजारो रुपयांचा माल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,चांदवड येथील नाईकवाडीपुरा भागातील एसबीआय (SBI) बँकेच्या पाठीमागे असलेल्या एका घराच्या आडोशाला गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. यावेळी मोसिन फारूक तांबोळी (वय ३०) हा इसम लोकांच्या आरोग्यास घातक असलेल्या प्रतिबंधित गुटख्याची बेकायदेशीर विक्री आणि साठवणूक करताना मिळून आला. जप्त केलेला मुद्देमाल
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत विविध कंपन्यांचा सुगंधित पान मसाला आणि तंबाखू जप्त केल्या आहे.प्रीमियम राजनिवास पान मसाला,विमल पान मसाला (किंग आणि बिग पॅक),वि-१ किंग पॅक तंबाखू,जाफरानी जर्दा आणि इतर नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.
या सर्व मालाची एकूण किंमत सुमारे ४,२२२ रुपये इतकी आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई प्रदीप गणपत आजगे,यांच्या फिर्यादीवरून आरोपीत मोसिन तांबोळी याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ मे २०२४ रोजी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस हवालदार सचिन अरुण राऊत,करत आहेत.सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या अशा अवैध व्यवसायांविरुद्ध चांदवड पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे परिसरातून स्वागत होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या