निफाड :- नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील समाज कल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह, रसलपूर' येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या वसतिगृहात विविध प्रवर्गातील एकूण ५२ रिक्त जागा भरण्यात येणार असून,यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जागांचा तपशील:
प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, शालेय स्तरावर ३५, कनिष्ठ महाविद्यालयासाठी ७, वरिष्ठ महाविद्यालयासाठी ७ आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३ अशा एकूण ५२ जागा रिक्त आहेत. यामध्ये अनुसूचित जाती, विमुक्त जाती (अ), इतर मागासवर्ग (OBC) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) मधील विद्यार्थ्यांसाठी जागांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक संवर्गात समांतर आरक्षण ठेवण्यात आले आहे.विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा:

या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक मोफत सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये:
- उच्च दर्जाचे भोजन.
- दरमहा १,००० रुपये निर्वाह भत्ता.
- स्टेशनरी, छत्री आणि गमबूट यासाठी लागणारी रक्कम.
- शैक्षणिक सहल खर्च.
अर्ज प्रक्रिया:
प्रवेशासाठी इच्छुकांनी https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी ०२५५०-२४१९११, ९४०४१८२२२७ किंवा ९४०४२७५२२७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन गृहपाल ए. डी. मांडे यांनी केले आहे.

0 टिप्पण्या