कळवण :- पाण्याचे बोर चालू करण्याच्या क्षुल्लक कारणावरून सामाईक शेतात नातेवाईकांमध्येच जोरदार हाणामारी झाल्याची घटना कळवण तालुक्यातील भांदणे येथे घडली आहे.या वादात कुऱ्हाडीच्या दांड्याने आणि स्वयंपाकाच्या साहित्याने मारहाण करण्यात आली असून,अभोणा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुमनबाई बबन वाघ आणि आर हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक (भाऊबंद) आहेत.त्यांचे शेत आणि त्यातील पाण्याचे बोर सामाईक आहे. फिर्यादीचे पती बबन वाघ हे बोर चालू करण्यासाठी गेले असता,समोरचे इसम नामदेव भाऊराव वाघ,रविंद्र नामदेव वाघ,आणि भूषण नामदेव वाघ,यांनी त्यांना मारहाण केली.
या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी सुमनबाई आणि त्यांची मुले तेथे गेली असता वाद अधिकच विकोपाला गेला. यावेळी समोरील इसम रोशन नामदेव वाघ याने सुमनबाई यांच्या डोक्यात कुऱ्हाडीच्या दांड्याने मारून जखमी केले.तसेच रविंद्र वाघ याने साक्षीदार गुलाब वाघ यास लग्नातील भात हलवण्याच्या मोठ्या पळीने (हत्त्याने) पाठीवर व पायावर मारहाण केली. इतर आरोपींतांनीही कुटुंबातील इतर सदस्यांना हाताने मारहाण करून "आमच्या नादी लागलात तर जीवाने मारून टाकू" अशी धमकी देत शिवीगाळ केली.याप्रकरणी सुमनबाई वाघ यांच्या फिर्यादीवरून अभोणा पोलिसांनी नामदेव वाघ,रोशन वाघ,रविंद्र वाघ आणि भूषण वाघ यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.या घटनेचा पुढील तपास अभोणा पोलीस करत आहेत.
0 टिप्पण्या