नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे ‘डिपार्टमेंट ऑफ हँड सर्जरी अँड ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन’ विभागाच्या शुभारंभानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या विभागाच्या माध्यमातून हाताच्या जटिल दुखापती, नसांचे विकार,टेंडन इन्ज्युरी,ट्रॉमा, मायक्रोसर्जरी तसेच पुनर्बांधणी शस्त्रक्रिया (Reconstructive Surgeries) यांसाठी अत्याधुनिक आणि तज्ज्ञ उपचार सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध झाल्या आहेत.या विभागाचे नेतृत्व प्रसिद्ध प्लास्टिक, हँड आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रो सर्जन डॉ. प्रणित मानकरे करणार आहेत. विशेष म्हणजे,डॉ. प्रणित मानकरे यांनी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत १५० हून अधिक प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या असून, त्यांच्या कौशल्यपूर्ण उपचारांमुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.या विभागामध्ये औद्योगिक अपघातांमधील हाताच्या दुखापती,नस आणि रक्तवाहिन्यांच्या इजा, बोटे तुटणे, जन्मजात विकृती, जळीत जखमा, टेंडन आणि नर्व्ह रिपेअर तसेच ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शनसारख्या जटिल शस्त्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात येणार आहेत. विशेषतः मायक्रोसर्जरी तंत्रामुळे अतिशय सूक्ष्म रक्तवाहिन्या आणि नसांचे पुनर्जोडणी (Reconstruction) अधिक अचूकतेने करता येणार आहे.
तसेच,गंभीर भाजलेल्या रुग्णांवर (Burn Patients) उपचार करण्यामध्येही या विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ४०% किंवा त्यापेक्षा अधिक भाजलेल्या रुग्णांनाही आधुनिक उपचारपद्धती, प्लास्टिक सर्जरी आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीपणे बरे करण्यात आले आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. प्रणित मानकरे म्हणाले,हात हा आपल्या दैनंदिन आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. हाताच्या दुखापतीमुळे रुग्णांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित होते.वेळेवर आणि योग्य उपचार मिळाल्यास अनेक गंभीर दुखापतींमध्ये हाताची कार्यक्षमता पुन्हा पूर्ववत करता येते. मायक्रोसर्जरी तंत्रज्ञानामुळे आम्हाला अतिशय सूक्ष्म नस,रक्तवाहिन्या आणि ऊतींची पुनर्बांधणी अचूकपणे करता येते. त्यामुळे रुग्णांना अधिक चांगले परिणाम आणि जलद पुनर्वसन मिळते.”
ते पुढे म्हणाले,
“औद्योगिक क्षेत्र वाढत असताना हाताच्या दुखापतींचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. अशा वेळी नाशिकमध्येच जागतिक दर्जाच्या हँड आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी सुविधा उपलब्ध होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आमचे उद्दिष्ट केवळ शस्त्रक्रिया करणे नसून, रुग्णांना पुन्हा आत्मविश्वासाने दैनंदिन जीवन जगण्यास सक्षम करणे हे आहे. गंभीर भाजलेल्या रुग्णांनाही योग्य उपचार आणि पुनर्बांधणीद्वारे नवजीवन देता येते, हा आमचा अनुभव आहे.
यावेळी बोलताना अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख श्री. अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की,अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुपर स्पेशालिटी सेवा सातत्याने उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो.‘हँड सर्जरी अँड ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन’ विभागाच्या माध्यमातून आता नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मोठ्या शहरात न जाता तज्ज्ञ मायक्रोसर्जरी आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह उपचार स्थानिक पातळीवर मिळणार आहेत. डॉ. प्रणित मानकरे यांनी केलेल्या १५० हून अधिक यशस्वी प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह शस्त्रक्रिया ही त्यांच्या कौशल्याची साक्ष आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली हा विभाग रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल,असा आम्हाला विश्वास आहे.”
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, प्रशिक्षित वैद्यकीय टीम आणि आधुनिक मायक्रोसर्जरी सुविधा उपलब्ध असून, रुग्णांना सुरक्षित, अचूक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी हॉस्पिटल कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
0 टिप्पण्या