नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे ऑर्थोपेडिक विभागाच्या वतीने डायरेक्ट अँटेरियर मिनिमली इन्वेसिव्ह हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियांचे ५० हून अधिक यशस्वी टप्पे पूर्ण झाल्याबद्दल विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांना मिळणाऱ्या फायद्यांविषयी माहिती देण्यात आली.
या उल्लेखनीय कामगिरीचे श्रेय ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.सागर काकतकर आणि त्यांच्या टीमला जाते.त्यांनी Direct Anterior Approach या अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
या पद्धतीबाबत माहिती देताना तज्ज्ञांनी सांगितले की,डायरेक्ट अँटेरियर अॅप्रोच ही एक मिनिमली इन्वेसिव्ह (कमी जखम करणारी) शस्त्रक्रिया पद्धत आहे. या तंत्रामध्ये स्नायू कापण्याऐवजी त्यांच्या मधील नैसर्गिक मार्गातून शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे स्नायूंना कमीत कमी इजा होते, रक्तस्त्राव कमी होतो, वेदना कमी होतात आणि रुग्णांना जलद पुनर्वसन मिळते.रुग्ण शस्त्रक्रियेनंतर लवकर चालू शकतात आणि अल्पावधीतच त्यांच्या दैनंदिन जीवनात परत येऊ शकतात.
विशेष म्हणजे,अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल हे नाशिकमधील MIS Direct Anterior Hip Replacement Surgery साठी एकमेव मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्र आहे.या प्रगत तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी देशभरातील अनेक ऑर्थोपेडिक सर्जन्स डॉ.सागर काकतकर यांच्याकडे प्रशिक्षणार्थी म्हणून येतात.यामुळे नाशिक शहराला या विशेष शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाच्या शिक्षणाचेही एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळख मिळत आहे.
यावेळी बोलताना डॉ.सागर काकतकर म्हणाले,
“हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ही पूर्वी मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया मानली जायची. मात्र, डायरेक्ट अँटेरियर अॅप्रोचमुळे आज आपण रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित,अचूक आणि सुलभ बनवू शकलो आहोत. स्नायूंना कमीत कमी इजा होत असल्यामुळे रुग्णांना कमी वेदना होतात आणि ते लवकर उभे राहून चालण्यास सक्षम होतात.आमच्यासाठी ही केवळ शस्त्रक्रियांची संख्या नसून,प्रत्येक रुग्णाच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल आहे.तसेच, या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी देशभरातील डॉक्टर आमच्याकडे येतात, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.नाशिकमध्ये जागतिक दर्जाचे उपचार आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे.”
या कार्यक्रमात ऑर्थोपेडिक विभागातील इतर तज्ज्ञ डॉक्टर,वैद्यकीय कर्मचारी आणि हॉस्पिटलचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी डॉ. राहुल सुपे,डॉ. जयेश सोनजे आणि डॉ.श्रीकांत जाधव यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधत या महत्त्वपूर्ण टप्प्याबद्दल टीमचे विशेष कौतुक केले.
यावेळी बोलताना अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की,
“अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांना सर्वोत्तम आरोग्यसेवा देणे हा आमचा ध्यास आहे. डॉ. सागर काकतकर आणि त्यांच्या टीमने साध्य केलेला हा टप्पा अत्यंत अभिमानास्पद आहे.तसेच,आमचे हॉस्पिटल नाशिकमधील एकमेव मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे या क्षेत्रात आमची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.भविष्यातही आम्ही अशाच नाविन्यपूर्ण आणि रुग्ण-केंद्रित सेवा देण्यास कटिबद्ध आहोत.”या यशस्वी टप्प्यामुळे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया क्षेत्रात आपली विश्वासार्हता अधिक दृढ केली असून, नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी जागतिक दर्जाची उपचार सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून दिली आहे.
0 टिप्पण्या