सावधान! तुमच्या घराचे कुलूप सुरक्षित आहे का? उंदीरवाडीत घडलेल्या या घटनेने नागरिक धास्तावले!


येवला तालुक्यातील उंदीरवाडीत धाडसी घरफोडी; ७१ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
Yeola crime news
(येवला प्रतिनिधी)
येवला :- तालुक्यातील उंदीरवाडी येथे एका शेतकऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ७१ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,उंदीरवाडी येथील रहिवासी राजेंद्र सुदाम साळुंके (वय ३७) हे आपल्या कुटुंबासह राहतात. १७ मे च्या रात्री ११:३० ते १८ मे च्या पहाटे २ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप आणि कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारला.या चोरीमध्ये २२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे नेकलेस, १५ हजारांची सोन्याची पोत, सोन्याचे वेल, डूल, सोन्याच्या अंगठ्या आणि चांदीचे कडे असा एकूण ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.याप्रकरणी राजेंद्र साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येवला तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजि. नं. २६४/२०२६ नुसार बीएनएस कलम ३३१ (४) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या