मटण खाण्याच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांना दगडाने व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण; गुन्हा दाखल


(कळवण प्रतिनिधी)
कळवण :- मटण खाण्याच्या किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत एका कुटुंबाला शिवीगाळ करत दगडाने आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना कळवण परिसरात घडली आहे.या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात तीन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टोलनाक्यासमोरील मोकळ्या जागेत वाद मिळालेल्या माहितीनुसार,२६ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सप्तशृंगी गडवार टोलनाक्याजवळ असलेल्या एका मोकळ्या जागेत ही घटना घडली.फिर्यादी पोपट मंगा बर्डे (वय ४५, रा. पुणेगाव) हे आपल्या कुटुंबासह असताना,संशयित आरोपीत दारूच्या नशेत त्या ठिकाणी आले.'तुम्ही काय मटण खाण्यासाठी आले का?'संशयित आरोपींनी"तुम्ही काय मटण खाण्यासाठी आले का? खाली चला,तुम्हाला मटण खाऊ घालतो,"असे म्हणत फिर्यादी पोपट बर्डे व साक्षीदार मिनाबाई यांना कारण नसताना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. फिर्यादी बर्डे हे संशयितांना समजावून सांगत असतानाच, आरोपीने हातातील दगड थेट त्यांच्या डोक्यात मारला.यामध्ये बर्डे गंभीर जखमी झाले.सोडवण्यासाठी आलेल्या मुलांनाही मारहाण,हा वाद पाहून फिर्यादींचा मुलगा ज्ञानेश्वर आणि मावस भावाचा मुलगा सोपान वाघ,हे दोघे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आले.मात्र,संशयितांनी त्यांनाही सोडले नाही.त्यांनाही दगडाने,लाथाबुक्यांनी आणि हाताने बेदम मारहाण करण्यात आली व जीवे मारण्याची धमकी दिली.
तीन जणांवर गुन्हे दाखल
या प्रकरणी फिर्यादी पोपट बर्डे यांच्या तक्रारीवरून कळवण पोलीस ठाण्यात सं.आरोपीत छोटू कैलास पवार,कैलास पवार आणि नानाजी जिभाऊ पवार (सर्व रा. पिंपळे बु,ता.कळवण) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(२), ११५(२), आणि ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.या प्रकरणाचा पुढील तपास कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बत्तीसे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या