पीएम स्वनिधी योजनेबद्दल मोठी अपडेट संपर्क साधण्याचे आवाहन - उपायुक्त सुवर्णा दखणे

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) - योजनेंतर्गत नाशिक शहरात लोक कल्याण मेळाव्याचे आयोजन नाशिक महानगर पालिकेच्या वतीने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) - योजनेंतर्गत शहरातील विविध बाजारपेठ,आठवडी बाजार इ ठिकाणी दि.१ ते ३० जून २०२६ या कालावधीत लोक कल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.नाशिक महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) पुनर्रचित योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.या योजनेचा उद्देश शहरातील पथविक्रेत्यांना सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे.पात्र पथविक्रेत्यांना कर्ज
या योजनेअंतर्गत पात्र पथविक्रेत्यांना प्रथम टप्प्यात रुपये १५,०००/- पर्यंत, द्वितीय टप्प्यात रुपये २५,०००/- पर्यंत आणि तृतीय टप्प्यात रुपये ५०,०००/- पर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.तसेच या कर्जावर केंद्र शासनाकडून ७% पर्यंत व्याज अनुदान देण्यात येत असून, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त लाभ दिले जातात. योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना क्रेडिट कार्ड सुविधा, डिजिटल व वित्तीय साक्षरता प्रशिक्षण तसेच विविध शासकीय योजनांशी जोडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या योजनेची अंमलबजावणी सुलभ व पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असून अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आलेली आहे.लाभार्थ्यांना डिजिटल ऑनबोर्डिंग,UPI व QR कोड सुविधा तसेच जलद कर्ज वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय, सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांशी जोडण्याचे कार्यवाही करण्यात येत आहे.
नाशिक महानगर पालिकेच्या वतीने शहरातील विविध बाजारपेठ, आठवडी बाजार इ ठिकाणी दि. १ ते ३० जून २०२६ या कालावधीत लोक कल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून या शिबिरांमध्ये अर्ज भरणे,आवश्यक कागदपत्रांची तपासणी व मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच ज्यांचे दुसरे कर्ज म्हणजेच २० हजार रुपये कर्ज पूर्ण झाले आहे त्यांनी योजनेंतर्गत उपलब्ध क्रेडीट कार्ड करिता सदर मेळाव्यात अर्ज करावा.शहरातील सर्व पात्र पथविक्रेत्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन नाशिक महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.सविस्तर माहितीसाठी राजीव गांधी भवन,पीएम स्वनिधी विभाग,नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सुवर्णा दखणे,उपायुक्त(DAY-NULM)नाशिक महानगरपालिका, नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या