crime news - लाखांची बोलेरो पिकअप चोरून चोरटे फरार; दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज, लेटेस्ट न्यूज, क्राईम न्यूज,दिंडोरी,,नाशिक,नाशिक ग्रामीण पोलीस 

दिंडोरीत घराबाहेर उभी केलेली बोलेरो पिकअप गाडी चोरीला; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

दिंडोरी (नाशिक):- दिंडोरी शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, येथील मोठा कोळीवाडा परिसरातून एक जुनी बोलेरो पिकअप गाडी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,फिर्यादी राकेश सुधीर आंबेकर (वय ३८, धंदा- ड्रायव्हर, रा. मोठा कोळीवाडा,दिंडोरी) यांनी आपली महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप गाडी (क्र. MH 15 JC 7818) नेहमीप्रमाणे परिसरातील रवि कापसे यांच्या पिठाच्या गिरणी शेजारी उभी केली होती.२३ मे २०२६ च्या रात्री ८ वाजेपासून ते २४ मे २०२६ च्या सकाळी ९ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने या गाडीचा लॉक तोडून ती चोरून नेली.२ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास चोरीला गेलेल्या या पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीवर निळ्या रंगाचे पट्टे आहेत. या गाडीची किंमत अंदाजे २,००,००० (दोन लाख) रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गाडीचा चेसी नंबर MA1ZN2TTKR6C3446 आणि इंजिन नंबर TTR4B25170 असा आहे.पोलिसांत गुन्हा दाखल
गाडी चोरीला गेल्याचे लक्षात येताच राकेश आंबेकर यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवादार अमोल साळवे (बकल नंबर ८१) करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या