त्रंबकेश्वर नाशिक :- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव शिवारात एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.गाईच्या वासरांना अन्न-पाण्यापासून वंचित ठेवून,त्यांचा क्रूरतेने छळ करून त्यांना ठार मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेमकी घटना काय?
गणेशगाव शिवारातील मुजम्मिल सिराजउद्दीन कोकणी,याच्या'सुगरा फार्म'जवळ हा प्रकार घडला.आरोपीतांनी गाईच्या वासरांना कोणतीही दया न दाखवता अन्न आणि पाण्याशिवाय ठेवले.तसेच त्यांना गंभीर दुखापत करून क्रूरतेने ठार मारले.एवढेच नव्हे तर,मृत वासरे मोकळ्या जागेत उघड्यावर टाकून दिली.यामुळे परिसरात संसर्गजन्य आजार पसरून लोकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होऊ शकला असता.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी खालील संशयित आरोपीतांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे
मुजम्मिल सिराजउद्दीन कोकणी (वय ५० वर्षे)मुदत्सिर सिराजउद्दीन कोकणी (वय ४८ वर्षे)हुमेरा मुजम्मिल कोकणी (वय २२ वर्षे)
(सर्व राहणार: गणेशगाव, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक)
सध्या आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
पोलीस पाटलांच्या सतर्कतेमुळे गुन्हा उघड गणेशगावचे पोलीस पाटील'दत्तु बबन लिलके'(वय ३५) यांनी या क्रूर प्रकाराबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३२५, २७१,२७२,२८० आणि प्राण्यांना छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एस.एन.निंबेकर करत आहेत.
0 टिप्पण्या