(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक: समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या तसेच दुर्गप्रेमी,दुर्गसेवक व सामाजिक संघटना याचा शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था,नाशिक यांच्या वतीने शंभूराजे जन्मोत्सवानिमित्त किल्ले रामशेज येथे “छत्रपती शंभूराजे गडमित्र पुरस्कार”देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक संघटना या गटातून सकल मराठा परिवार नाशिक यांना हा पुरस्कार देण्यात आला.या प्रसंगी वरुण भामरे,दुर्गराज रायगड विकास प्राधिकरणचे वास्तू संवर्धक चेतन राजापूरकर पुरातन नाणी संशोधक रमेश पडवळ नाशिकच्या ऐतिहासिक पाऊलखुणांचे संशोधक तसेच राम खुर्दळ, या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरवपूर्ण सन्मान प्रदान करण्यात आला.सकाळी ध्वजारोहण करून तसेच गडाचे पूजन करून छत्रपती संभाजी महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच शंभूराजे जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी सकल मराठा परिवार चे खंडू आहेर, दत्ता काळे, स्नेहल चौधरी(काळे ), प्रविण देशमूख, योगेश वरखेडे,अडव्होकेट गौरव मोहिते, कैलास देशमुख,समाधान पाटील शिवप्रेमी तसेच दुर्गसांवर्धक, दुर्गप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.हा सन्मान संपूर्ण सकल मराठा परिवारातील प्रत्येक शिवप्रेमी बांधवाचा असून, गडकोट संवर्धन आणि शिवकार्याची प्रेरणा अधिक बळकट करणारा आहे.
0 टिप्पण्या