मंत्री गिरीश महाजन यांनी जाणून घेतले परिक्रमा मार्ग बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे

नाशिक :- नाशिक शहर परिसरात साकारण्यात येणाऱ्या परिक्रमा मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी ऐकून घेतले.जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात दरी,मातोरी,मुंगसरे,गोवर्धन परिसरातील शेतकरी आज दुपारी आले होते. त्यावेळी मंत्री महाजन यांनी या शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.तसेच त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. 

यावेळी महापौर हिमगौरी आडके- आहेर,आमदार हिरामण खोसकर,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर,राकेश सेपट, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील आदी उपस्थित होते. 

मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की,परिक्रमा मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल. याबाबत शासन आणि जिल्हा प्रशासन संवेदनशील आहे. तसेच जिल्हाधिकारी श्री. प्रसाद हे लवकरच या गावांना भेट देतील.यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित राहतील.ते शेतकऱ्यांशी संवाद साधत मार्ग काढतील.या गावांमध्ये मोजणीवेळी अनुचित प्रकार घडला असेल,तर त्याची चौकशी करून कार्यवाही केली जाईल. महिला शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील,तर त्यांनी अपर जिल्हाधिकारी श्रीमती पाटील यांच्याकडे नोंदवावी,असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.आ.खोसकर यांनी विविध सूचना केल्या. यावेळी शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी