समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी लासलगाव येथे इमारतीची आवश्यकता
नाशिक :- लासलगाव, ता. निफाड येथे समाजकल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहासाठी भाडेतत्वावरील इमारतीची आवश्यकता आहे. वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना उत्तम सोयीसुविधा मिळण्यासाठी सर्व सोयीसुविधांयुक्त (वीज, पाणी उपलब्धता असलेली) सुस्थितीतील आणि आरसीसी बांधकाम असलेली इमारत भाडेतत्वावर आवश्यक आहे.इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ८९९९३९१२३७, ८९७५२७७०१८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लासलगाव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा