नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
"Nashik Police Action"
नांदगाव :- दि. ०७/०४/२०२६ रोजी रात्रीचे सुमारास नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत विष्णुनगर, पोखरी शिवारात कोणीतरी अज्ञात आरोपीतांनी फिर्यादी यांचे घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश करून घरातून मोबाईल फोन व मोटर सायकलची चावी घेवून स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने मोटर सायकल व मोबाईल फोन चोरून नेले बाबत नांदगाव पोलीस स्टेशन गुरनं १३६/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०५(अ), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत व उपलब्ध तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषणाद्वारे गोपनीय माहिती घेवून राहता व कोपरगाव येथून खालील संशयीतांना ताब्यात घेतले आहे.
१) सागर ज्ञानेश्वर गायकवाड, वय १९, रा. पिंपळवाडी, शिर्डी, ता. राहता, जि. अहिल्यानगर
२) सनी बबन जाधव, वय २१, रा. इंदिरानगर,कोपरगाव,ता.कोपरगाव, जि. अहिल्यानगर,यातील ताब्यात घेतलेले संशयीतांना वरील गुन्हयाचे समांतर तपासात विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांचे कब्जातून वरील गुन्हयात चोरीस गेलेली बजाज कंपनीची पल्सर एन.एस. १२५ मोटर सायकल व रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन असा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींना गुन्हयाचे पुढील तपासाकामी नांदगाव पोलीस ठाणेस हजर करण्यात आले असून त्यांचे कडून घरफोडी व चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
वरील घरफोडीचे गुन्हयात वरिष्ठांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेवून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
0 टिप्पण्या