नाशिक महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामगिरीबाबत सत्कार पारितोषिक देऊन गौरव

नाशिक :- महाराष्ट्रातील सैनिकांचे कल्याण व पुनर्वसन, शहीद सैनिक कुटुंबीयांना मदत याकामी नाशिक महानगरपालिकेने जिल्ह्यातून सर्वात जास्त (दहा लक्ष आठ हजार रुपये - प्रथम क्रमांकाने) ध्वज निधी संकलित केल्याबद्दल जिल्हाधिकारी  जलज शर्मा यांनी नाशिक महानगरपालिकेच्या मनपा कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत प्रशंसा केली तसेच शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, प्रशस्ती पत्रक व पारितोषिक देऊन गौरव केला. 

नाशिक महानगरपालिकेच्यावतीने लेखा विभागाचे उपलेखापाल  सूर्यभान खोडे, रमेश उदावंत यांनी सत्कार स्वीकारला. या निधी संकलनात आयुक्त व मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा विभागाचा मोठा सहभाग असल्याने लेखा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले.

सदरचे प्रशस्ती पत्रक व पारितोषिक आयुक्त तथा प्रशासक अशोक करंजकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी