नाशिक - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने पत्नीच्या खुनाचा गुन्हा सिद्ध झालेल्या आरोपीला जन्मठेपेची आणि दंडाची मोठी शिक्षा

(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा;नाशिक सत्र न्यायालयाचा मोठा निकाल चारित्र्याच्या संशयातून आणि दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून स्वतःच्या पत्नीची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी पतीला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आजन्म कारावास (जन्मठेप) आणि दंडाची ठोठावली आहे. महादु गंगाराम खेडुलकर (वय ३७, रा. वाघेरा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश ए. के. लाहोटी (कोर्ट क्र. १) यांनी या खटल्याचा निकाल दिला.

नेमकी घटना काय होती?
ही धक्कादायक घटना ४ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा येथे घडली होती. आरोपी महादु खेडुलकर याने आपली पत्नी गुलाबाबाई खेडुलकर (वय ३७) हिच्या चारित्र्यावर संशय घेतला होता.तसेच दारू पिण्यासाठी तिने पैसे न दिल्याने दोघांमध्ये वाद झाला.या वादाचे पर्यावसान मोठ्या रागात झाले.आरोपीने घरात असलेला कोयता हातात घेऊन गुलाबाबाई यांच्या मानेवर आणि डोक्यावर गंभीर वार केले.या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने गुलाबाबाई यांचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी हरसुल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पोलिसांनी सादर केलेले सबळ पुरावे ग्राह्य धरत आरोपीला दोषी ठरवले.नवीन कायद्यानुसार खालील कलमांखाली शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बीएनएस कलम १०३ (खून) आजन्म कारावास (जन्मठेप) आणि १०,००० रुपये दंड.दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावास.
बीएनएस कलम ३५२: १ वर्ष साधा कारावास आणि ५,००० रुपये दंड. दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास.

पोलीस प्रशासनाची उल्लेखनीय कामगिरी:
या गुन्ह्याचा तपास हरसुल पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मोहित वि.मोरे,यांनी केला.त्यांनी घटनेनंतर अत्यंत वेगाने भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते.
न्यायालयात सरकारी अभियोक्ता (सरकारी वकील) जगदीश सोनवणे,यांनी सरकार पक्षातर्फे खटला चालवला.त्यांना पैरवी अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कोठुळे,यांनी मदत केली.तसेच नाशिकच्या गुन्हे दोषसिद्धी विभागाच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा गावीत,आणि महिला पोलीस अंमलदार अश्विनी परदेशी,यांनी या खटल्यात वेळोवेळी कायदेशीर मार्गदर्शन करून पाठपुरावा केला.
या सर्व गुन्ह्यातील तपास प्रकरणी पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन:
पोलीस आणि न्याय व्यवस्थेच्या प्रभावी समन्वयामुळे आरोपीला अवघ्या दोन वर्षांत शिक्षा मिळवून देण्यात यश आले आहे.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस.स्वामी,आणि अपर पोलीस अधीक्षक विमला एम.यांनी तपास अधिकारी,पैरवी अधिकारी आणि गुन्हे दोषसिद्धी विभागाचे विशेष अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या