भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण; महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी केले अभिवादन


मनपाच्या वतीने क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंती
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त नाशिक महापालिकेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन,मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस महापौर हिमगौरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमास उपायुक्त नितीन नेर,जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,श्रीकांत भोई,आकाश शिनगाण, रमेश पागे, भाऊसाहेब पवार,अशोक कोरडे,मनोज गायधनी,सुनील भाबड,गणेश देवरे,अथर्व बडे,वर्षा दोंदे,छाया चौधरी,शकुंतला साळवे, संगीता रानपसारे, कोमल वाघमारे, अशोक कोरडे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या