नाशिक :- महानगरपालिकेच्या वतीने भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ यावेळी घेण्यात आली.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शालिमार चौक येथील स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यास उपमहापौर विलास शिंदे व उपायुक्त नितीन नेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे, पश्चिम विभागीय अधिकारी हेमंत झुटे, मनोज खैरनार, आकाश शिनगाण, किरण जठार,अनिल लोहकरे, जगन्नाथ हांबरे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व उपायुक्त नितीन नेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,मनीषा पाटेकर,श्रीकांत भोई, आकाश शिनगाण,संजय पटेल,दीपक पुरी,विनीत गांगुर्डे,राकेश पवार, मनोज गायधनी,संतोष निकम,यश बारगजे,तुषार पटाईत,विजय दौडे,विजय निचीते आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शासन निर्देशानुसार राष्ट्रीय एकात्मता दिवसा निमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी घेतली.शपथेचे वाचन मनीषा पाटेकर यांनी केले.
0 टिप्पण्या