कोणत्याही नगरसेवकाने मोफत बस मागितली नाही, सिटीलिंक प्रशासनाचे स्पष्टीकरण

(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नगरसेवकांकडून मोफत बसची कोणतीही मागणी नाही; 'सिटीलिंक'चा जाहीर खुलासा
नाशिक: नाशिक महानगरपालिकेच्या 'सिटीलिंक' शहर बससेवेबाबत एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे प्रशासनाने खंडन केले आहे.कोणत्याही नगरसेवकाने आपल्या कार्यक्रमासाठी मोफत बस उपलब्ध करून देण्याची लेखी किंवा तोंडी मागणी केलेली नसल्याचा अधिकृत खुलासा नाशिक महानगरपालिका आणि सिटीलिंक प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
१८ नोव्हेंबर २०२६ रोजी एका आघाडीच्या दैनिकात 'नगरसेवकांना हवी सिटीलिंक फुकट, आयुक्तांनी लावला मनमानीला ब्रेक' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती.या वृत्तामध्ये नाशिक महानगरपालिकेचे सदस्य (नगरसेवक) मोफत बससेवेची मागणी करत असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
प्रशासनाचा अधिकृत खुलासा
या वृत्ताची गंभीर दखल घेत कार्यकारी अभियंता (यांत्रिकी), नाशिक महानगरपालिका यांनी १९ नोव्हेंबर रोजी याबाबत जाहीर खुलासा प्रसिद्ध केला आहे. या खुलाशात प्रशासनाने पुढील मुद्दे स्पष्ट केले आहेत:
• मोफत बसची मागणी नाही: संबंधित बातमीत नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही नगरसेवकाने कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमासाठी मोफत बसेस उपलब्ध करून देण्याची लेखी अथवा तोंडी मागणी केलेली नाही.
• प्रसिद्ध झालेली माहिती अयोग्य: नगरसेवकांकडून मोफत बसची मागणी होत असल्याचा वृत्तातील दावा पूर्णपणे चुकीचा आणि अयोग्य आहे.नाशिककरांना दर्जेदार आणि चांगली बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींचे आवश्यक मार्गदर्शन नेहमीच मिळत असते. नाशिक महानगरपालिका आणि सिटीलिंक प्रशासन नागरिकांना उत्कृष्ट बससेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे.या जाहीर खुलाशामुळे मोफत बसच्या मागणीवरून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या