नाशिकमध्ये ९ नोव्हेंबरला रंगणार 'दीपावली सांज व दीपोत्सव' सोहळा; सारेगामापा विजेता अभिजित कोसंबी ठरणार मुख्य आकर्षण
नाशिक :- दिवाळीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून नाशिकमध्ये एका भव्य सांस्कृतिक आणि संगीतमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.महेश धोडपकर प्रस्तुत 'दीपावली सांज व दीपोत्सव' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून,यात मेघ मल्हार हिंदी व मराठी गीतांचा नजराणा रसिकांसाठी सादर केला जाणार आहे.मध्य नाशिक आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्राचा महागायक आणि 'सारेगामापा' विजेता अभिजित कोसंबी हे असणार आहेत. त्यांच्या सुमधुर आवाजाने नाशिककर मंत्रमुग्ध होणार आहेत. हा कार्यक्रम सोमवार, दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक ०६:०० वाजता, छाजेड उद्यान,शर्मा मंगल कार्यालयासमोर, दिपाली नगर, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.दिग्गज कलाकारांची लाभणार साथ
या संगीतमय संध्येत अभिजित कोसंबी यांच्यासोबतच अनेक सहकलाकार आपली कला सादर करणार आहेत. यामध्ये: सहगायिक देवानंद पाटील,अपर्णा माडीवाले आणि मिनल धोडपकर.वाद्यवृंद: कीबोर्डवर अनिल धुमाळ, निवेदक म्हणून सचिन जाधव,ऑक्टोपॅड व हँडसोनिकवर प्रतिक पाटील,तर तबला व ढोलकीची धुरा स्वतः महेश धोडपकर सांभाळणार आहेत.आयोजक आणि प्रमुख उपस्थितीया कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मा. नगरसेवक तथा शहर उपाध्यक्ष भा.ज.पा. यशवंत निकुळे व नगरसेविका (प्रभाग क्र. २३) तथा महिला बालकल्याण सदस्य रुपालीताई निकुळे हे आहेत.तसेच या कार्यक्रमाला पुर्व प्रभाग सभापती मंगला ननावरे,जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत खोडे,नगरसेविका संध्या अभिजीत कुलकर्णी,प्रकाश ननावरे यांच्यासह विनय नगर परिसर ज्येष्ठ नागरिक मंडळ, हरि हरेश्वर बहुद्देशीय संस्था,सीता वल्लभ बहुद्देशीय संस्था,ओम श्री कौसल्येश्वर महादेव बहुद्देशीय संस्था,शिवाजी वाडी नंदिनी नगर मित्र मंडळ, विनय नगर सप्तश्रृंगी देवी मंदिर सामाजिक संस्था,आणि शिव पंचायत हनुमान मंदिर मित्र मंडळ साईनाथ नगर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.आयोजक नगरसेविका रुपालीताई निकुळे, यशवंत निकुळे यांच्या वतीने परिसरातील सर्व नागरिकांना या दीपोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या