राजीव नगर येथे १० नोव्हेंबरला रंगणार 'पाडवा पहाट' संगीतमय सोहळा; आशा भोसले यांच्या सुमधुर गीतांची मैफल! - सतीश सोनवणे


नाशिक :- युनिक ग्रुप आयोजित आणि व्ही. के. म्युझिकल्स प्रस्तुत 'पाडवा पहाट' अंतर्गत 'या सुखांनो या...' या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता भगवती चौक, राजीव नगर येथे संपन्न होणार आहे.युनिक ग्रुपचे संस्थापक आणि माजी नगरसेवक सतीश (बापू) सोनवणे यांच्या पुढाकाराने सालाबादप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नाशिककरांची सकाळ सुरांची उधळण करणारी ठरणार आहे.
आशादीदींच्या गाण्यांचा नजराणा
ख्यातनामी, बहुआयामी, हरहुन्नरी आणि सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या एकाहून एक सरस आणि सुमधुर गीतांनी ही 'पाडवा पहाट' सजणार आहे. या मैफलीमध्ये सुप्रसिद्ध गायक श्री. विवेक केळकर आणि सुप्रसिद्ध गायिका तृप्ती देब आपल्या स्वरांनी नाशिककर रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.सुरेल साथसंगत आणि सूत्रसंचालन या दिमाखदार सोहळ्याला नावाजलेल्या वादक कलाकारांची साथ लाभणार आहे:
• हार्मोनिअम: दिव्या रानडे
• तबला: सौरभ शिंदे
• सिंथेसायझर: जितेंद्र सोनावणे
• पर्कशन: फारूक पिरजादा
• गिटार: आशिष ढेकणे
• ध्वनीव्यवस्था: पराग जोशी
या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार निवेदन (सूत्रसंचालन) प्रज्ञा कुलकर्णी करणार आहेत.
राजीव नगर आणि परिसरातील संगीतप्रेमी नागरिकांनी या स्वरमयी पाडवा पहाट कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी सभागृह नेते सतीश बापू सोनवणे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या