मखमलाबाद विद्यालयात महिला सुरक्षेचा जागर; पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन

. 
फोटो: मखमलाबाद विद्यालयात महिला सुरक्षितता चर्चा सत्रात सहभागी दिपक अरगडे,मिना पवार,शितल महाले,जिजा भुसारे,चंद्रभागा मौळे,कैलास कुशारे,प्राचार्य रामनाथ गडाख, पर्यवेक्षक संजय हांडगे व सर्व शिक्षिका
------------------------------------------
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालय, मखमलाबाद येथे महिला सुरक्षितता चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक म्हसरूळ पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे हे होते. त्यांचे समवेत दिपक अरगडे, मिना पवार,शितल महाले,जिजा भुसारे,चंद्रभागा मौळे व कैलास कुशारे उपस्थित होते.प्राचार्य रामनाथ गडाख व पर्यवेक्षक संजय हांडगे यांच्या शुभहस्ते प्रमुख अतीथींचा यथोचित सत्कार करण्यात आला.
पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थित महिलांना स्वतःची काळजी घ्या,आत्मविश्वास ठेवा,छेडछाड, अत्याचार या विरुद्ध आवाज उठवा,स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घ्या, त्वरीत मदतीसाठी निर्भया पथक,दामिनी पथक व आपत्कालीन क्र. ११२ वर संपर्क करावा. तसेच सायबर सेल च्या पोलीस अधिकारी जिजा भुसारे यांनी सायबर फसवणूकी पासून सावधानता बाळगण्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.त्या म्हणाल्या इन्स्टाग्राम,फेसबुक व डीपी वरून AI च्या माध्यमातून बदल करता येतो. सायबर गुन्ह्यासाठी १९३० क्रमांकावर संपर्क करावा.अश्या अनेक मुद्यांवर चर्चा करून महिलांच्या सुरक्षिततेबाबत जागृतता निर्माण केली.या चर्चा सत्राचे सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी केले. कला शिक्षक दत्तात्रय पवार व राहुल भामरे यांनी उत्कृष्ट फलकलेखन केले.कार्यक्रमास सर्व शिक्षिका व महिला शिक्षकेतर कर्मचारीवृंद मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या