नाशिक महापालिका शिक्षण विभाग सेवानिवृत्त हयात दाखला सादर न केल्यास पेन्शन ला ब्रेक..!


 
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- महानगरपालिका शिक्षण विभागातील सेवानिवृत्त् वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना कळविण्यात येत कि, नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील सेवानिवृत्ती वेतनधारक यांचे हयात असलेले बाबतचा दाखला शिक्षण विभागामार्फत खालील कालावधीत स्विकारण्यात येणार आहे.तरी सदर कालावधीत सर्व सेवानिवृत्त् शिक्षकांनी समक्ष येवुन दाखला सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी.

दिनांक १६ नोंव्हेबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत हयात असल्याचा दाखला नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग कार्यालय राजीव गांधी भवन, मनपा मुख्यालय, शरणपुररोड नाशिक येथे (सोमवार ते शुक्रवार) स्विकारण्यात येईल.उपरोक्त् कालावधीत निवृत्ती वेतनधारक / कुटुंब निवृत्ती वेतनधारक (पेंन्शनधारक) यांनी हयात असल्याचा दाखला सादर न केल्यास माहे जानेवारी २०२७ ची पेंन्शन् अदा केली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी.
प्रशासन अधिकारी
नाशिक महानगरपालिका, शिक्षण विभाग,नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या