नाशिक :- दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. मात्र, सर्वसामान्य नागरिक आपल्या कुटुंबीयांसोबत सण साजरा करत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बांधवांना अहोरात्र कर्तव्य बजावावे लागते.त्यांच्या या सेवाभावी वृत्तीची जाणीव ठेवत इंजि.शिवम पाटील यांनी सहकाऱ्यांसमवेत पोलीस बांधवांसोबत दिवाळी साजरी करून सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश दिला.
सण असो अथवा उत्सव,ऊन-पाऊस आणि दिवस-रात्र यांची तमा न बाळगता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर असणाऱ्या पोलिस दादांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पोलिसांशी संवाद साधत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.नागरिकांच्या आनंदासाठी स्वतःच्या सण-उत्सवावर पाणी सोडणाऱ्या पोलिसांच्या कार्याचा गौरवही करण्यात आला.
यावेळी उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी संजय पिसे,जलपुरुष दारूनकर महाराज,नरेंद्र वाणी,भालेराव काका,अमित आडके,अनिल परदेशी,संदीप खातळे,उमेश उगले,प्रसाद भालेराव,पवन बागूल,सचिन भडके,मुरलीधर कोरडे, युवराज पाटील,रोशन दांडगे,यश भालेराव,निखिल मोरे,चेतन घाडगे आणि चंदू घोडे सहभागी झाले होते.
पोलिस बांधवांसोबत साजरी केलेली ही दिवाळी माणुसकी,आपुलकी आणि सामाजिक जाणीवेचा संदेश देणारी ठरली.
0 टिप्पण्या