राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदजीी यांच्या शुभेच्छा...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनाच्या विशेष प्रसंगी सर्व स्वयंसेवकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा! ज्यांनी आपल्या अथक परिश्रमाने आणि सेवाभावाने संघाचे संगोपन व संवर्धन केले आहे, त्या सर्व विभूतींनाही मी नमन करतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सेवा, राष्ट्र उभारणी आणि सामाजिक बांधिलकीचे गौरवशाली शताब्दी वर्ष पूर्ण केले आहे. असंख्य स्वयंसेवकांनी आपल्या समर्पण, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्र-प्रथम भावनेने नेहमीच समाजाच्या उत्थानासाठी कार्य केले आहे.
मला पूर्ण विश्वास आहे की, ही भावना येणाऱ्या काळातही देशाला अधिक सशक्त आणि सुदृढ करेल.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या