क्राईम न्यूज - लाखो रुपयांचा गांजा जप्त! नाशिक पोलिसांची गांजा विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई; २ अटकेत

गांजा विक्रीसाठी वाहतूक करणारे 2 आरोपीसह (3,15,722 रु मुद्देमालसह 4. किलो 351 ग्रॅम गांजा जप्त) चांदवड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांची संयुक्त कारवाई


(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
चांदवड :- आज दि. 19/10/2026 रोजी चांदवड पोलीस स्टेशनचे मा. पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे, सहा पोलीस निरीक्षक अमोल मोरे व स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे,पोलीस हवालदार सुभाष चोपडा,संदीप महाजन,योगेश कोळी तसेच चांदवड पोलीस ठाणेचे सहा पोलीस उप निरीक्षक भाऊसाहेब गुळे,पोलीस हवालदार अमोल जाधव,चेतन बागल,दिनेश सुळ,राजू गायकवाड,स्वप्निल रंधे,प्रदिप आजगे,योगेश हटकर, विक्रम बस्ते यांच्या पथकाने सयुक्त कारवाई केली आहे.आज रोजी चांदवड तालुक्यातील वागदर्डी शिवारातील वागदर्डी शिंगवे रस्त्यावर धरणाजवळ दोन इसम अवैधरित्या गांजा विक्री करण्यासाठी वाहतूक करत आहे बाबत गोपनीय माहिती मिळाल्याने वरील पथकाने मिळालेल्या बातमी प्रमाणे दोन पंच समक्ष खात्री करून संशयीत इसम नामे- आनंद पांडुरंग परदेशी वय 47 वर्ष रा. संभाजीनगर मनमाड तालुका नांदगाव व संजय काशिनाथ शिंदे व 57 वर्ष रा. रापली तालुका चांदवड जिल्हा नाशिक यांना 17/20 वा. जागीच पकडुन त्यांची दोन पंचासमक्ष अंग झडती घेतली असता त्यांचे ताब्यात 4 किलो 351 ग्रॅम गांजा (95,722 रु) व सुझुकी बर्गमॅन मोटार सायकल क्रमांक MH41BW8808 व बजाज कंपनीची प्लॅटिना मोटर सायकल क्रमांक MH41BZ9488 असे
मिळून आल्याने तसा पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी जप्ती पंचनामा करून आरोपी 1) आनंद पांडुरंग परदेशी वय 47 वर्ष रा. संभाजीनगर मनमाड तालुका नांदगाव व 2) संजय काशिनाथ शिंदे व 57 वर्ष रा. रापली तालुका चांदवड जिल्हा नाशिक यांचे विरुद्ध पोलीस निरीक्षक दत्ता निराबा कांभिरे स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांनी दिलेल्या फिर्यादी वरून चांदवड पोलीस ठाणे येथे अमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (C), 20 (B) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मा. पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या