के बी एच विद्यालय दही हंडी गोपाळ काला उत्साहात साजरा


जुने नाशिक : -आदिवासी सेवा समिती नाशिक संचलित,कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय वडाळा शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून गोपाळ काला कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारित गीते,नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यानंतर दहीहंडी व गोपाळ काल्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.मुख्याध्यापक सतिश लिंडाईत,यांनी गोपाळ काल्याच्या माध्यमातून एकता, सहकार्य,बंधुभाव आणि सामूहिक सहभागाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने काल्याचा प्रसाद घेतला.
कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील पर्यवेक्षक महेंद्र बाविस्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुषमा मराठे,सूत्रसंचालन संदीप पवार, यांनी केले.मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विद्यार्थ्यांच्या समवेत उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या