सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत
नाशिक :- नाशिकचे पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या गंगापूर रोडवरील मध्यवर्ती कार्यालयाला भेट देत संस्थेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले.यावेळी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीने बुधवार दि. ९ रोजी मविप्र संस्थेच्या प्रांगणात आयोजित ‘इको बाप्पा-2.0’ कार्यक्रमासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मान्यवर आले होते. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सर्वप्रथम मविप्र संस्थेला भेट दिली.याप्रसंगी मविप्र संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे,चिटणीस दिलीप दळवी,संचालक ॲड.संदीप गुळवे,ॲड.रमेशचंद्र बच्छाव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पालकमंत्री महाजन यांनी मविप्र संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करीत आगामी कुंभमेळ्यात नेहमीप्रमाणे संस्थेचे सहकार्य लागणार असल्याचे सांगितले. पदाधिकाऱ्यांनीदेखील प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे पालकमंत्री महाजन यांना सांगितले.याप्रसंगी नाशिक महापालिका महापौर हिमगौरी आहेर आडके,आ.प्रा.देवयानी फरांदे,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह,मनपा आयुक्त मनीषा खत्री,
उपमहापौर विलास शिंदे,सभापती मच्छिंद्र सानप,माजी आ.बाळासाहेब सानप,नगरसेवक सुधाकर बडगुजर,भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी,मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉ.भास्कर ढोके, डॉ.नितीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या