नाशिक :- महानगरपालिकेच्या वतीने भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुद्ध द्वितीया हा दिवस अवतार दिन तिथीनुसार साजरा करण्यात आला.
मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस उपमहापौर विलास शिंदे व उपायुक्त नितीन नेर यांच्या हस्ते भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच त्यांच्या कार्याविषयी माहितीचे वाचन यावेळी उपस्थितांमध्ये करण्यात आले.या कार्यक्रमास जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,साहेबराव भोसले,श्रीकांत भोई,मनोज गायधनी,रमेश पागे,सुरक्षा विभागाचे अशोक कोरडे,सतीश पटाईत,अर्जुन सानप,कृष्णा शिंदे, विनोद चौधरी,भाऊसाहेब पवार, तसेच वैशाली उबाळे,राजश्री अवचित्ते,कोमल वाघमारे,यमुना जाधव, छाया चौधरी, दर्शना देशमुख,शकुंतला साळवे,मनीषा गोहिल,सुरेखा सुपेकर आदींसह अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या