मविप्र निवृत्त सेवक संघाच्या वार्षिक सभेत ७५ वर्षे पूर्ण ५६ सेवकांचा सत्कार
नाशिक :- मविप्रच्या सेवानिवृत्त सेवकांच्या मागणीनुसार आडगाव येथील मविप्र रुग्णालय परिसरात 'मविप्र सेवक सदन'उभारण्याच्या मागणीस तत्त्वतःमान्यता देण्यात आली आहे,असे आश्वासन मविप्र सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांनी दिले.नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज निवृत्त सेवक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी अँड उत्तमराव जाधव उपस्थित होते.सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सभेच्या प्रारंभी संघाचे 75 वर्षे पूर्ण केलेल्या 56 ज्येष्ठ सभासदांचा सरचिटणीस अँड नितीन ठाकरे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ, सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला.ज्येष्ठ सभासदांच्यावतीने सहदेव जामदार यांनी सत्कारारथींचे मनोगत व्यक्त केले.सभेच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. संघाचे अध्यक्ष अँड उत्तमराव जाधव यांनी संघाच्या वाटचाली विषयी प्रास्ताविक विचार व्यक्त केले. या प्रसंगी बोलतांना अँड नितीन ठाकरे म्हणाले की,मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या प्रगतीमध्ये सेवानिवृत्त सेवकांचे मोठे योगदान आहे.संस्थेत नव्याने येणार्या सेवकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावा.संघाच्या सर्व मागण्यांचा यापूर्वी सकारात्मक विचार करून सोडविण्याचा प्रयत्न मविप्र संस्थेच्या कार्यकारिणीने केला आहे.मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालय परिसरात बहु उद्देशीय "मविप्र सेवक सदन " उभारण्याच्या मागणीस तत्त्वतः मान्यता याप्रसंगी त्यांनी दिली.सभेत विषय पत्रिकेवरील सर्व 1 ते 9 विषयांना सभागृहाने एकमुखी मंजूरी दिली. त्यात प्रामुख्याने घटना दुरूस्ती योजना मसुदा मान्य करण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन विजय काकळीज यांनी केले. संघाचे सचिव कवी माणिकराव गोडसे यांनी सभासदांच्या शंकांचे निरसन केले. संघाचे सहसचिव सुदाम आहेर यांनी आभार मानले.
सभेस कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी उपाध्यक्ष अशोक देवकर, सचिव माणिकराव गोडसे, सहसचिव सुदाम आहेर, संघाचे संचालक सर्वश्री लक्ष्मण तिडके, अरुण पिंगळे, दिनकर गोसावी, विठ्ठल पवार, पोपटराव नवले, सदाशिव भामरे, जनार्दन खैरनार, विजय काकळीज, संजय जाधव, अशोक सोनवणे, रघुनाथ हळदे, मोहन कणसे, विजय जाधव, प्रा.डॉ.बाळासाहेब पवार, प्रा.रमेश पाटील, प्रा.यशवंत कापडणीस महिला संचालिका शोभा आरोटे, अनिता घोलप, मंगला पवार आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक :मविप्र निवृत्त सेवक संघाच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी ज्येष्ठ सभासदांचा सन्मान करताना प्रमुख पाहुणे मविप्र सरचिटणीस अँड नितीन ठाकरे,समवेत संघाचे आजी माजी पदाधिकारी उत्तमराव जाधव, अशोक देवकर, माणिकराव गोडसे, संपतराव पाटील, हांडगे सर, माणिकराव गोडसे आदी.
0 टिप्पण्या