AI सारखी कितीही तंत्रज्ञाने आली तरीही शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकत नाही - सुनील चव्हाण माजी मुख्य सचिव,कृषी मंत्रालय, महाराष्ट्र राज्य

नाशिक येथील स्वर्गीय उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन व डीएसएफ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना सुनील चव्हाण (माजी मुख्य सचिव,कृषी मंत्रालय,महाराष्ट्र राज्य) यांनी स्पष्ट केले की,कितीही तंत्रज्ञाने विकसित झाली तरीही शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.पुरस्कार वितरण रविवार दि. 6/9/2026 रोजी सकाळी 10.30 वा. सुनील चव्हाण,मुख्य सचिव,कृषी मंत्रालय, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक प्रवीण जाधव होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अभिजीत पाटील,मा.संगणक विभाग प्रमुख, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ,संजय जाधव, चेअरमन,जीवक स्कूल ऑफ नर्सिंग,लाख मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर उपस्थित होते.सिंदखेडचे लखुजी राजे जाधव यांचे सोळावे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली.पुरस्कार वितरण सोहळा जीवक स्कूल ऑफ नर्सिंग, भाग्यलक्ष्मी कॉम्प्लेक्स,दिंडोरी रोड, म्हसरूळ,नाशिक येथे पार पडला. या प्रसंगी स्व.मातोश्री मंदाकिनी रमेश जाधव यांचे स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुद्धा झाले.विजेत्यांना रोख पारितोषिके, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी गुरुजनांमध्ये रत्नाकर वेळीस(नाशिक) राजेंद्र कोहकडे (अहिल्यानगर),आनंद वाघमारे (मुंबई),श्रीमती श्वेता पांडे (ठाणे), प्रशांत जगताप (जळगाव), मेघश्याम शिंदे (जळगाव), उमेश खंदारकर (जालना), अनिल रावले (परभणी), विकास कल्याणकर (हिंगोली), पिराजी कुसळे (बीड), दीपक क्षीरसागर (कोल्हापूर), अजित पाटील (सांगली),चंद्रकांत भिसे (सातारा),अविनाश दुधाने (पुणे),काझी मोहम्मद (पुणे), विशाल पवार (धुळे),डॉ.नितीन भुजबळ (बुलढाणा),गजानन देशमुख (बुलढाणा),मनोज तुसे (नाशिक),डॉ.कांचन सोनार (नाशिक), मेघा वरखेडे (नाशिक), शेख अफ्रीन (नाशिक),भिलाजी पाटील (नाशिक),संजय भुमकर (परभणी), विकास कल्याणकर (हिंगोली),यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विजया दुधारे,स्वागत व प्रास्ताविक अशोक दुधारे,पाहुण्यांचा परिचय डॉ.बाळासाहेब घुले,आभार प्रदर्शन दीपक निकम यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन होण्यासाठी अशोक कदम,अस्मिता मोगल,दिपाली घुले,राजू शिंदे,ज्योती निकम,सुचिता गीते,भूषण बटाटे, मंजिरी चौधरी,रसिका गायकवाड यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या