मालेगावात पोलिसांचे मध्यरात्री 'ऑलआऊट ऑपरेशन'; ११ तलवारींसह मुद्देमाल जप्त, ९ आरोपी गजाआड!

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी मालेगाव शहरात गुरुवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली.पोलीस अधीक्षक डॉ डि एस स्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार मालेगाव शहरात रात्री २ वाजेपासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत‘कोंबिंग आणि ऑलआऊट ऑपरेशन’राबवून गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली.या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल १५ लाख ९२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ९ आरोपींना अटक केली आहे.मालेगाव शहरातील विविध संवेदनशील आणि संशयास्पद ठिकाणांवर पोलिसांनी अचानक छापे टाकले.या मोहिमेत सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेणे,अवैध धंदे करणाऱ्यांवर छापेमारी करणे आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.११ तलवारी आणि वाहने जप्त या प्रभावी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई केली.यामध्ये ११ तलवारी आणि १ सुरा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय गुटखा तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करत २५ मोटरसायकली आणि १ रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे.७ गुन्हे दाखल,९ जणांना अटक
या संपूर्ण मोहिमेत मालेगाव शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत एकूण ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यामध्ये पवारवाडी पोलीस ठाण्यात ५, आयशानगर पोलीस ठाण्यात १ आणि आझादनगर पोलीस ठाण्यात १ गुन्हा दाखल झाला असून,एकूण ९ सं.आरोपींतांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.मोठा पोलीस बंदोबस्त तैनात या धडक कारवाईत मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक,मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्यासह ८ प्रभारी अधिकारी,२२ दुय्यम अधिकारी आणि १५४ पोलीस अंमलदारांच्या फौजफाट्याने सहभाग घेतला होता."जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी आणि अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आगामी काळातही अशीच कडक कारवाई सुरू राहील,"असा इशारा नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासनाने दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या