सकल मराठा परिवारातर्फे आण्णासाहेब महामंडळ कर्ज वितरण सुलभ करण्यासाठी सिन्नर तहसीलदारांना निवेदन

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
सिन्नर :- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनांमध्ये मराठा समाजातील युवकांना येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी सकल मराठा परिवारातर्फे आज सिन्नर,नाशिक येथे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले.यावेळी सकल मराठा परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवेदनात खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या उत्पन्न दाखला निकष सुलभ करून शेतीप्रधान युवकांना कर्जाचा लाभ द्यावा.प्रतिवर्षी किमान १ लाख कर्जप्रकरणे मंजूर करावीत. LOI नंतर बँकांकडून होणारी अडवणूक व अनावश्यक तारण जामीनदाराच्या अटींबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे.व्याज परताव्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून वेळेत परतावा द्यावा.LOI मंजूर लाभार्थ्यांचा नियमित फॉलोअप घेऊन तालुकास्तरावर समन्वयक नियुक्त करावेत.हेल्पलाईन,ई-मेल व ऑनलाइन तक्रार निवारण सुविधा प्रभावीपणे सुरू करावी.रद्द झालेल्या LOI धारकांना पुनर्विचार करून पुन्हा LOI मिळण्याची संधी द्यावी.मराठा समाजातील युवकांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी मागणी करण्यात आली.याप्रसंगी रविंद्र पवार,रोहित बुचकुल,दिनेश मेदगे,प्रमोद घोलप,महेश मुरकुटे, जगदीश उगले,संतोष बोलधने,भाऊसाहेब टेमगर,शिवाजी गायधनी,धनाजी आगळे,निलेश ढमाले,दत्ता देशमुख डॉ.विकास मेदगे,आदी सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या