नाशिक - जिल्हयात रेड अलर्ट मुसळधार पावसाची शक्यता नागरिकांसाठी जाहिर सुचना



नाशिक :- भारतीय हवामान खात्याने उद्या मंगळवार दिनांक ७ जुलै, २०२६ रोजी नाशिक जिल्हयात रेड अलर्ट मुसळधार पावसाची/अतिवृष्टी होऊन ढग फुटीची शक्यता वर्तवली आहे. त्याअनुषंगाने नाशिक महानगरपालिका हद्दितील सर्व खाजगी शैक्षणिक क्लासेस व खाजगी आस्थापना/कार्यालये (अत्यावश्यक सेवा वगळून) बंद ठेवण्यात यावेत.शक्य असेल तेथे वर्क फ्रॉम होम व्दारे कामकाज करण्यात यावेत.तसेच ज्या ईमारतीना बेसमेंट आहेत तेथे पाणी साचण्याची शक्यता असुन त्याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन उपाययोजना करण्यात याव्यात. असे नाशिक महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
(मनिषा खत्री भा.प्र.से.)
आयुक्त नाशिक महानगरपालिका, नाशिक.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या