पर्यावरण संवर्धनाची विद्यार्थ्यांची शपथ; लासलगाव महाविद्यालयात १०० वृक्षांचे रोपण

लासलगाव :- नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विभागाच्या वतीने पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला.संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी ५० नारळ व ५० चिंचेची रोपे अशी १०० वृक्षांची लागवड केली.प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे,यांच्या संकल्पनेतून झालेल्या वृक्षारोपण उपक्रमात पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करणे,त्यांचे संरक्षण करणे तसेच स्वच्छ व हरित परिसर निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी गोविंदराव होळकर,हसमुखभाई पटेल, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे, लेप्ट. बापू शेळके, डॉ.प्रदिप सोनवणे,शीतल गुंजाळ,मीनल होळकर,इ.उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ घेत"मी स्वतःअस्वच्छता करणार नाही आणि इतरांनाही स्वच्छता राखण्यासाठी प्रेरित करेन,"अशी सामूहिक शपथ घेण्यात आली. पर्यावरण विषयाची शपथ कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर यांनी दिली.पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने त्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे,होते.तसेच पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार,प्रा.किशोर गोसावी,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर,प्रा.देवेंद्र भांडे, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(जाहिरात)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या