नाशिक :-शहर व धरण परिसरामध्ये होणाऱ्या सततधार पावसामुळे शहरांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आज दुपारी १२.०० ते ३.०० वाजेपर्यंत धोकादायक परिस्थिती उद्भवणेचा इशारा देण्यात आलेला आहे.पाऊस सतत सुरू राहिल्यास दुपारी ३.०० वाजेनंतर डेंजर झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे.त्यामुळे सर्व विभागीय अधिकारी यांना तात्काळ सुचित करण्यात येते की,त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील परिसरामध्ये व नदीकाठच्या भागांमध्ये स्वतः फिरून लाऊड स्पीकर वरून सतर्कतेचा इशारा देण्यात यावा.तसेच आपत्कालीन परिस्थितीत नदीकाठच्या भागांमध्ये रहिवास करणाऱ्या नागरिकांना स्थलांतर करण्याची आवश्यकता भासल्यास तातडीने बांधकाम विभाग,शिक्षण,विभाग,आपत्कालीन विभागाने व विभागीय कार्यालयाने समन्वय राखून वेळेत मदतकार्य व कामकाज करावे.सर्व विभागीय अधिकारी यांनी त्यांचे विभागांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असणाऱ्या सर्व साधन सामग्री सुस्थितीत असल्या बाबत खात्री करून तसा अहवाल अतिरिक्त आयुक्त यांचे कडेस सादर करावा.वरील सूचनांची सर्व विभागीय अधिकारी व संबंधित विभाग यांनी तातडीने अंमलबजावणी करावी.अशा सुचना मनिषा खत्री,आयुक्त नाशिक महानगरपालिका,नाशिक यांनी दिल्या आहेत.
0 टिप्पण्या