मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणासह घरकुल योजनांच्या अंमलबजावणीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
नाशिक,दि.2जुलै2026: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाची प्रभावी आणि कालबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येवला तालुक्यातील अंगणगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण,उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.गटविकास अधिकारी संदीप वायाळ,मुख्याधिकारी येवला नगरपालिका तुषार आहेर,तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड,उपअधीक्षक भूमी अभिलेख पुष्पा गाडे,पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुमेरसिंग पाकल व चव्हाण आदी उपस्थित होते
त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी प्रथम येवला तहसील कार्यालयाला भेट देऊन मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेतला.हा कार्यक्रम कालबद्ध असल्याने सर्व कामे भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन करून काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
त्यानंतर उपविभागीय कार्यालय, येवला येथे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी महसूल विभागाच्या 26 योजनांसह घरकुल योजनांच्या कामकाजाचा आढावा घेतला. शासनाच्या घरकुल योजनांसाठी पात्र असलेला एकही लाभार्थी वंचित राहणार नाही,याची दक्षता घेऊन सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
(जाहिरात)
0 टिप्पण्या