नाशिक,दि.16: सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या अनुषंगाने नाशिक शहरातील प्रस्तावित परिक्रमा मार्ग (रिंग रोड) प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने गतीने सुरू आहे.या प्रक्रियेत मौजे जलालपूर, ता. नाशिक येथील गट क्रमांक 57 मधील 0.21 हेक्टर आर क्षेत्राचे खरेदीखत मथुरा एन.वनसे यांच्या संमतीने यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) यांच्या माध्यमातून परिक्रमा मार्गासाठी आवश्यक जमिनीची थेट खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे.या प्रक्रियेत जमीनधारकांनी शासनाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पास सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य केले. सहाय्यक जिल्हाधिकारी पवन दत्ता,यांच्या उपस्थितीत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गट क्रमांक 57 चे खरेदीखत करण्यात आले. यावेळी मथुरा एन.वनसे,यांना भूसंपादनाचा रु. 2 कोटी 26 लाख 36 हजार 165 रूपयांचा मोबदला धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आला.या खरेदी प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संदीप पांडागळे, यांच्या समन्वयातून आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात आली.शासनाच्या महत्त्वाकांक्षी परिक्रमा मार्ग प्रकल्पासाठी भूसंपादनास सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांनी मथुरा एन.वनसे,यांचे अभिनंदन केले.जमीनधारकांच्या सकारात्मक सहभागामुळे भूसंपादन प्रक्रियेला गती मिळत असून, सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या अनुषंगाने प्रस्तावित पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्यास त्याचा मोठा हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 टिप्पण्या